छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट – मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली.
बैठकीत स्मारक उभारणीसाठी आवश्यक निधीची तरतूद, जमिनीचे भूसंपादन, वास्तुविशारद नेमणूक, बांधकामाचे टप्पे आणि मौजे आंबडवे येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अनुसूचित जाती-जमातीतील सफाई कामगारांच्या मुलांसाठी अंबरनाथ परिसरातील शाळा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्व्हेन्शन सेंटर उभारणीची प्रक्रिया गतीने करण्यावरही भर देण्यात आला.