Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता

admin
Last updated: 2025/08/13 at 4:48 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट – अमेरिकेच्या करवाढीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. ते न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) शिखर परिषदेत सहभागी होऊ शकतात. या दौऱ्यात त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होण्याचीही शक्यता आहे.

मोदींच्या या दौऱ्याचा प्रमुख उद्देश व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा करून शुल्क (टॅरिफ) विषयक तणाव सोडवणे आणि परस्पर समन्वय साधणे असा असू शकतो. यामुळे भारत-अमेरिका व्यापार करारावर पुढील वाटचाल होऊ शकते. गेल्या सात महिन्यांत मोदी आणि ट्रम्प यांची ही दुसरी भेट असू शकते. फेब्रुवारी 2025 मध्ये मोदींनी व्हाईट हाऊसला भेट दिली होती. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध होते, मात्र दुसऱ्या कार्यकाळात करवाढ आणि व्यापार धोरणांमुळे तणाव वाढला आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेचे 80वे सत्र 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उच्चस्तरीय चर्चासत्र 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान होईल. डोनाल्ड ट्रम्प 23 सप्टेंबर रोजी जागतिक नेत्यांना संबोधित करतील, तर नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरच्या सकाळी भाषण देतील. त्याच दिवशी इझ्रायल, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचे प्रमुखही भाषण करणार आहेत.

भारत-अमेरिका व्यापार चर्चेत शेती व दुग्धजन्य क्षेत्रात भारताची अनिच्छा हा मोठा अडथळा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने भारतीय उत्पादनांवर 25% करवाढ आणि रशियन तेल खरेदीवर अतिरिक्त 25% कर लावला आहे, ज्यामुळे एकूण कराचा बोजा 50% झाला आहे. अर्धे कर 7 ऑगस्टपासून लागू झाले असून, उर्वरित 27 ऑगस्टपासून लागू होतील. अंतिम मुदतीपूर्वी उच्चस्तरीय चर्चेतून तोडगा निघावा, यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. हा वाद केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, तो अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षे आणि भारताच्या जागतिक व्यापार हितसंबंधांमधील संघर्षाचे प्रतीक बनला आहे

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेकायदेशीर बेटिंग ऍप प्रकरणात सुरेश रैनाला ईडीची नोटीस
Next Article चीनने चेक प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींशी संबंध तोडले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?