नवी दिल्ली / मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत एक ट्विट केलं आहे. “सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं” असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. रियाचे वडील हे निवृत्त लष्करी अधिकारी असून त्यांनी देशाची सेवा केली असं देखील चौधरी यांनी म्हटलं आहे.
* रोहित पवारांनी दिले पुरावे
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून भाजपावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या काही बातम्या व भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी या राजकारणाचा पुरावाच दिला आहे. तसेच बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं देखील म्हटलं आहे. “सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा अजेंडा आहे. पण या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
भाजपाच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले 30 हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत.