सोलापूर, 14 ऑगस्ट – जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात 2025-26 सेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीपुरक औजारे व साहित्य वाटपासाठी लॉटरी सोडत पार पडली. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यांनी पात्र लाभार्थ्यांना वेळेत औजारे खरेदी करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या उपस्थितीत लॉटरीची सोडत जि. प. प्राथमिक शाळा, नेहरूनगर (उत्तर सोलापूर) येथील विद्यार्थ्यांकडून काढण्यात आली. सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांना विहित खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच थेट पद्धतीने योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावर क्षेत्रीय यंत्रणेशी समन्वय साधून वेळेत औजारे खरेदी करण्याचे आवाहन केले.