लातूर, 14 ऑगस्ट – लातूर येथे आज मराठा नेते मनोज जरांगे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सरनाईक यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्यात संवादही झाला.
परिवहन मंत्री सरनाईक गुरुवारी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, तर मनोज जरांगे देखील याच दिवशी लातूरच्या दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर दोघांची विशेष भेट झाली.