मुंबई, १६ ऑगस्ट – मुंबई महापालिकेत आगामी निवडणुकीत भाजपाचाच झेंडा फडकणार, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वाढत्या प्रभावाचा दावा केला. “वरळीकरांनी आधीच याचे संकेत दिले आहेत,” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित दहीहंडी उत्सवाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “पूर्वी येथे शिवसेनेचे नेते दहीहंडीचे आयोजन करत होते. मात्र यंदा भाजपाने भव्य दहीहंडीचे आयोजन करून प्रचंड गर्दी खेचली आहे. मुंबईची जनता आता भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपाचाच विजय होईल.”
या कार्यक्रमाला वरळीतील दहीहंडीचे आयोजक संतोष पांडे, मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.