वॉशिंग्टन, १८ ऑगस्ट – अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये रविवारी (दि.१७) रात्री झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. ही घटना ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’ या हॉटेलमध्ये घडली.
ब्रुकलिन पोलिस आयुक्तांच्या माहितीनुसार, ही घटना परस्पर वादातून झाली असून मृतांमध्ये तिघेही पुरुष आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
घटनास्थळावरून ३६ काडतुसे आणि एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’ हे हॉटेल २०२२ मध्ये सुरू झाले असून ते अमेरिकन आणि कॅरिबियन खाद्यपदार्थ, हुक्का, बार आणि डीजे संगीतासाठी लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये हॉटेलमध्ये रक्ताचे डाग आणि तुटलेल्या काचा दिसत आहेत.
यावर्षी आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराच्या ४१२ घटनांची नोंद झाली आहे