सोलापूर : रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणामुळे कोट्यवधी नागरिक बेरोजगार झाले आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन नागरिकांसह युवकांच्या भविष्यासाठी मोदी सरकारने तत्काळ रोजगार निर्मिती करावी, यासाठी शहर युवक कॉंग्रेसतर्फे “रोजगार दो’च्या घोषणा देत “मिस कॉल’ आंदोलन करण्यात आले.
वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे मोदी सरकारने आश्वासन दिले होते. मात्र उलट बेरोजगारांची संख्या वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर आवाज उठवण्यासाठी शहरात तीन ठिकाणी मिसकॉल आंदोलन करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात हे आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम यांच्या वतीने वालचंद कॉलेजजवळील गीतानगर येथे झालेल्या आंदोलनात करण्यात आले.
शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सुमीत भोसले, कार्याध्यक्ष ओंकार गायकवाड, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, सैफन शेख, राजासाब शेख, महांकाळी येलदी, संतोष अट्टेलूर, अजय सुगरे, मनोहर माचर्ला, संजय गायकवाड, किरण वल्लाल, उमर मुकेरी, नागेश म्याकल, शुभम यक्कलदेवी, सुभाष वाघमारे, सुशांत गायकवाड, धीरज सरवदे, आकाश बोन्द्रे यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.