नांदेड, 19 ऑगस्ट – नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हसनाळ गावात तीन महिलांचा बळी गेला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या महिलांचे मृतदेह गावातील युवकांनी बाहेर काढले.
मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे हसनाळ परिसरात मोठा हाहाकार माजला. गावात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांचा देखील मोठ्या प्रमाणात बळी गेला आहे.
अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, स्थानिक प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे.
