रोप फाउंडेशनच्या वतीने छायाचित्रकारांचा सन्मान
जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रोप फाउंडेशनच्या वतीने दैनिकात काम करणाऱ्याछायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार करण्यात आला, राज्य मराठीपत्रकार संघाच्या कार्यालयात कार्यक्रम पार पडला, प्रथमेश कोठे यांच्या हस्ते छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, आयोजक रोप फाउंडेशनचे प्रशांत बाबर, फोटो अँड व्हिडीओ जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर, प्रा. अश्विनकुमार नागणे, संपन्न दिवाकर, मुसा अत्तार मिलिंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती,
यावेळी रोप फाउंडेशनच्या वतीने राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला,
दैनिक आणि चॅनेल मध्ये काम करताना पत्रकार जितका महत्वाचा भाग आहे तितकेच छायाचित्रकार आणि कॅमेरामन देखील महत्वाचे आहेत, एखादी बातमी करताना फोटो किंवा व्हिडिओ महत्वाचा भाग असतो, सध्या डिजिटल युग आहे, समाजाला दृष्टिकोन देण्याचे काम हा छायाचित्रकार आणि कॅमेरामन करत असतो असे मत प्रथमेश कोठे यांनी केले,
यावेळी दैनिकात काम करणारे छायाचित्रकार आणि विविध वृत्तवाहिन्यामध्ये काम करणारे कॅमेरामन उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत बाबर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनकुमार नागणे यांनी केले तर आभार ईरांना जुजगार यांनी मानले