सोलापूर, २२ ऑगस्ट: सोलापूर ते मुंबई दरम्यान प्रवासी विमान सेवा सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केले. डीजीसीएकडून स्टार एअरला या मार्गावर उड्डाण करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटीशी झालेल्या करारानंतर ही सेवा सुरू होणार आहे. राज्य शासनाने “उडान” योजनेअंतर्गत १४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक विकासास चालना मिळेल.