सोलापूर, २२ ऑगस्ट: आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तरुणांसाठी एकत्रित आयटी क्लस्टर विकसित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी ८५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
कोठे यांनी सांगितले, “सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी पहिल्याच अर्थसंकल्पात ८५० कोटी मंजूर झाले. आता आयटी क्लस्टरसाठीची मागणीही पूर्ण होईल.” शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे.
नागपूर अधिवेशनात सोलापूरसाठी १४ प्रश्न मांडण्यात आले होते, ज्यातील बहुतेक प्रश्न मार्गी लागले आहेत.