सोलापूर, २२ ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यात यंदा ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती प्रतिष्ठापनेची परवानगी देण्यात आली आहे. यापैकी ११४० शहरी भागात तर ३०१४ ग्रामीण भागातील मंडळे आहेत. ग्रामीण भागात २५८ गावांनी “एक गाव-एक गणपती” संकल्पनेअंतर्गत उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
पोलिसांनी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी करून उत्सवादरम्यान नियमांचे पालन करण्याची हमी घेतली आहे. गतवर्षी २६८ गावांनी “एक गाव-एक गणपती” संकल्पना राबविली होती. शहरात नवीन मंडळांना परवानगी दिली जात नसल्याने मंडळांची संख्या जवळपास स्थिर राहिली आहे.
अंदाजे शहरात १.२५ लाख आणि ग्रामीण भागात ५ लाखांहून अधिक घरांमध्ये खाजगी गणपती स्थापनेची अपेक्षा आहे.