सोलापूर : सोलापूर, पुणे जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून दुचाकी चोरणार्या सराईत गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून 25 मोटारसायकलींसह सुमारे साडेअकरा लाखांचा माल लंपास केला आहे. परशुराम शिवाजी मोरे (रा.कलहिप्परगे ता. अक्कलकोट ) असे त्या चोरट्याचे नाव आहे.
परशुराम मोरे हा सराईत चोरटा बिगर नंबर प्लेट असलेली होंडा सीबी शाईन मोटार सायकल विकण्यासाठी वागदरी मार्गे आळंद येथे जाणार असल्याची माहिती पो.नि. अरूण सावंत यांना मिळाली. त्यावेळी पो.नि. सावंत यांच्या सूचनेनुसार स.पो.फौ. ख्वाजा मुजावर व इतर कर्मचर्यांनी वागदरी येथे सापळा रचला आणि परशुराम मोरे यास पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच सर्व गुन्ह्यांची उकल केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याने मागील दोन वर्षापासून सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तुळजापूर, इंदापुर, पुणे, तसेच गुलबर्गा, आळंद आदी भागातून मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. नातेवाईक, मित्रांना या सर्व गाड्या फायनान्सच्या लिलावात घेतलेल्याचे सांगत विकत होता. त्याने आतापर्यंत आळंद, गुलबर्गा, विजापूर या भागात गाड्या विकल्याचे सांगितले.
त्याने सोलापूर जिल्ह्यातील 11 व बाहेरील जिल्ह्यातील 14 अशा 25 गाड्या चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून या सर्व 25 गाड्या जप्त केल्या असून याची एकूण किंमत 11 लाख 45 हजार एवढी आहे. ही कामगिरी स.पो.फौ. ख्वाजा मुजावर, पो.हवालदार नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मनसावले, पो.कॉ. अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, विलास पारधी यांनी केली.