अकोला, २५ ऑगस्ट. अकोल्याच्या पातुर तालुक्यातील चान्नी ते सुकळी फाटा रस्त्याची चाळण झाली आहे. खराब रस्त्यांमुळे व अपघातांतील वाढत्या घटनांमुळे दिग्रस बू. येथे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, आजच्या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णांना आंदोलकांनी मात्र सहकार्य केले. यावेळी परिसरातील सरपंच, नागरिक, पोलीस आणि महसूल अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पण खेट्रीचे सरपंच जहूर खान यांनी थातूरमातूर दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.