छत्रपती संभाजीनगर, २६ ऑगस्ट। छत्रपती संभाजीनगर येथे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात मीराबाई ढगे (खोडेगाव), गीता बाळू गाडेकर (चित्तेपिंपळगाव), प्रमोद सोमीनाथ तारक (काऱ्हिळ), उर्मिला कृष्णा दहीहंडी (पिंपरी खुर्द, तालुका छत्रपती संभाजीनगर) यांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या संकट काळात दिलासा देणारी ही योजना खरोखरच शेतकरीहिताची ठरत असून अनेक कुटुंबांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. या योजनेमुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळत आहे आणि अपघाताच्या वेळी त्यांना आर्थिक मदत मिळवणे शक्य होत आहे.