नांदेड, २९ ऑगस्ट. लागोपाठ दुसऱ्या दिवशी नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज २९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती लक्षात घेता ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे राहुल कर्डिले यांनी सांगितले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर स्थिती पाहता लष्कराच्या अधिकाऱ्यांशी आपले बोलणे झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला
