मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हतं, वकिलांमध्ये समन्वय नव्हता. काँग्रेसच्या काही नेत्यांना हे आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षण म्हणजे कमीपणा वाटत होता, असा गंभीर आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांनी केला.
काँग्रेसच्या काही नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हतं, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांना हे आरक्षण नको होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून याचे खापर आता महाविकास आघाडी सरकारवर फोडले जात आहे.
मराठा मोर्चांना खतपाणी घालणे हे आमचे कल्चर नाही. समाजात अस्वस्थता निर्माण व्हावी ही आमची इच्छा अजिबात नाही, मात्र ज्यांच्या मुलांना आरक्षणाअंतर्गत शैक्षणिक प्रवेश मिळाला नाही, ज्यांच्या नोकऱ्या अगदी मिळता-मिळता राहिल्या, त्यांच्यात आपसूकच अस्वस्थता निर्माण होईल. आता मराठा समाजाला सरकारने योग्य ती मदत करावी, यासाठी आम्ही आंदोलन करु, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.