अकोला, 4 सप्टेंबर। एमआयडीसी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या सूफियान सेठ ची हत्या प्रकरणानंतर आज,गुरुवारी अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली. सकाळपासूनच पोलीस दलाने या शिवनी व एमआइडीसी या परिसरात थेट रस्त्यावर गुंडांची धिंड काढली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण दिसून आले.
पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खदान पोलिसांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे परिसरातील दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांचे मनोबल पूर्णतः खच्चीकरण झाले.पोलिसांनी या गुंडांना सार्वजनिक ठिकाणी उभे करून त्यांच्या कृत्यांची माहिती नागरिकांना दिली आणि कायदा मोडणाऱ्यांना कुठलाही पाठींबा मिळणार नाही असा ठाम संदेश दिला. तसेच गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, अकोल्यात गुन्हेगारीला अजिबात जागा नाही.ही कारवाई पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. लोकांनी पोलिसांच्या या पावलाचे जोरदार स्वागत केले. समाजात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सतत कार्यरत असल्याचे या कारवाईतुन स्पष्ट झाले आहे.