छत्रपती संभाजीनगर, 5 सप्टेंबर।
छत्रपती संभाजीनगर येथे गॅलक्सी रूग्णालयात मराठा आंदोलनाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांची मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद साधला. तसेच त्यांच्यावरील उपचारांची माहितीही डॉक्टरांकडून जाणून घेतली.