उज्जैन,7 सप्टेंबर : देशभरात जोरदार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी रात्री एका भीषण अपघातात पोलिसांची गाडी शिप्रा नदीत कोसळली. या गाडीमध्ये ठाणेप्रमुखांसह तीन पोलीस कर्मचारी होते.
ही घटना शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. शिप्रा नदीवरील मोठ्या पुलावरून जात असताना पोलिसांची गाडी अचानक नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. ठाणेदाराचा मृतदेह सापडला आहे, परंतु इतर दोन पोलीस कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. तब्बल 11 तासांहून अधिक काळापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मात्र उर्वरित दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
पावसामुळे नदीचे पाणी अधिक वेगाने वाहत असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. प्रशासनाकडून शोध मोहीमेस गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.