सोलापूर, 8 सप्टेंबर : आयटी पार्कसाठी कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील शासकीय जागेची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. या परिसरातील उपलब्ध जागा, आयटी पार्कला अनुकूल स्थिती याबाबत आढावा घेतला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूरच्या दौर्यात आ.विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला जागा शोधण्याचे आदेश दिले होते.
औद्योगिक विकास महामंडळांकडून आयटी पार्क उभे करू असे आश्वासन दिले आहेत.त्यानुसार आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेतला असून, नुकतेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जुनी मिल येथील जागेची पाहणी केली होती. होटगी तलावाशेजारील जलसंपदा जागेची पाहणी करून त्याचे ड्रोनद्धारे सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या टप्यात 20 जागेची पाहणी करून अहवाल तयार केले जात आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून आयटी पार्क साठी कुंभारी येथे जागेची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.