नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान करण्यासाठी ते रांगेत उभे होते. या निवडणुकीत एनडीए चे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय निश्चित मानला जात आहे.
मतदानस्थळी राज्यसभेतील तसेच लोकसभेतील सर्व खासदार उपस्थित राहून आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडत आहेत.
संपूर्ण वातावरण लोकशाहीच्या उत्सवाचे दर्शन घडवत असून, संसदेच्या प्रांगणात निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत असलेल्या प्रत्येक जनप्रतिनिधीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.