सोलापूर, 10 सप्टेंबर। शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. रस्त्यांवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवर कचरा टाकणार्या नागरिकांच्या विरोधात महापालिका ऑक्शन मोडवर आली आहे. रस्त्यांवर कचरा टाकणार्या विरोधात मोहीम घेऊन दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुुन्हे दाखल केले जाणार आहेत.माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील विविध भागात पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सह. आयुक्त शशिकांत भोसले, सह. आयुक्त मनीषा मगर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी उपस्थिती होते.कोनापुरे चाळ, मोदी, लष्कर,नळ बाजार, लोधी गल्ली, सिद्धार्थ चौक, पाथरूड चौक, अशोक चौक, बापूजीनगर अशा परिसरांना भेट देऊन त्यांनी घरोघरी घंटागाडी जाते का, कचरा संकलन नियमित होतो का? तसेच अरुंद बोळामध्ये गाडी जात नसल्यास त्या ठिकाणी मक्तेदारांनी अतिरिक्त कर्मचार्यांची नियुक्ती करून कचरा संकलन करावा. फुटपाथवर वाढलेले गवत, कचरा काढण्याबाबत सूचना केल्या. यापुुढे रस्त्यावर कचरा टाकणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या ठिकाणी घंटागाडी असूनही रस्त्यांवर कचरा टाकला जातो, तेथे संबंधित आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.