छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर। छत्रपती संभाजी नगर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातंग क्रांती मोर्चाचे वतीने निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर विविध संघटनांनी निवेदने दिली. यावेळी बहुजन विकास मंत्री अतुल सावे व खासदार भागवत कराड उपस्थित होते.
मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय ठोकळ यांनी सविस्तर समाजाच्या मागण्या सांगितल्या. सुधाकर चांदणे, अशोक गायकवाड, मारुती श्रीसागर, पांडुरंग कसबे आदी प्रमुख नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.