अमरावती, 17 सप्टेंबर। अमरावतीसह जिल्ह्यात शेतीसाठी पुरेसा पाऊस बरसला. शेतात चांगलं पिक डोलायला लागली असताना विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस मुसळधार कोसळत असल्यानं शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. सोमवारी अनेक भागात शेतात पाणी तुंबल्यानं सोयाबीन पीक अक्षरशः सडायला लागलं.
सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात गत ४८ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागानं आणखी दोन दिवस सावधतेचा इशारा दिलाय. सोमवारी दुपारी साडेचार वाजता वीजांच्या प्रचंड कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला.
पाऊस सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत असल्याचे हवामान खात्याने सांगितले. अशा परिस्थितीत आता काढणीला आलेलं सोयाबीनमध्ये आर्द्रता भरपूर राहते. शेतकऱ्यांजवळ ही आर्द्रता कमी करण्याचं कुठलही साधन नाही. तसेच जागा नाही. गावात पीक ठेवायला शेतकऱ्यांकडे जागा नाही.