छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर। आगामी निवडणुका या नेत्यांच्या नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या असल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज आणि सजग राहावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना केले.
या निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा पक्षाचा पाया असून तो मजबुत करण्याचे काम आपल्याला मिळून यशस्वी करायचे आहे, याप्रसंगी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवासेनेचे ऋषी जयस्वाल तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.