नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
एक्स-पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारले, “भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे म्हणण्याची संधी ट्रम्प यांना कशी मिळाली? पंतप्रधानांना कशाची भीती आहे? अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौरा का पुढे ढकलण्यात आला? भारताने शर्म अल-शेख परिषदेत भाग घेण्याचे का टाळले? पंतप्रधान ट्रम्प यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील विधानाचा निषेध का करत नाहीत?”
पार्श्वभूमी
बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. ट्रम्प यांनी सांगितले की, ते रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर नाराज आहेत आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपले मित्र म्हणून संबोधले.
ही टीका अशा वेळी आली आहे जेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपले ऊर्जा धोरण स्पष्ट केेले आहे, ज्यामध्ये देशहितासाठी रशियाकडून तेल आयात सुरू ठेवण्याचा समावेश आहे.