Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “धनगर आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकारला सळो की पळो करु “
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

“धनगर आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकारला सळो की पळो करु “

Surajya Digital
Last updated: 2020/09/15 at 4:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज दिला आहे.

ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याला आहे, अशी भूमिका OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“ओबीसी समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमीच केली. मराठा समाजाला एससीबीसीमध्ये घालण्याचं षडयंत्र झालं आहे. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही, ही कल्पना पूर्वीच होती आणि तेच घडलं. ओबीसी आणि मराठ्यांचा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता यापूर्वीही होती, जे सांगितलं तेच घडलं, असं शेंडगे यांनी सांगितले.

* काही मराठा नेता प्रक्षोभक वक्तव्य करत असल्याचा आरोप

आता मराठ्यांना आरक्षण कुठून देणार, हे कुणालाच ठाऊक नाही, मार्ग निघणं कठीण आहे. आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसीला आहे, त्यांनी भटक्या, मुक्तांचं आरक्षण मागू नये. ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, हे सांगण्याचा घाट काही मराठा संघटनांनी घातला आहे. ओबीसीच्या कणभर आरक्षणालाही धक्का लागणार नाही, असा कायदा आहे. पण काही मराठा नेता प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत, हे साफ चूक आहे. ओबीसीचं आरक्षण मिळणं गरजेचं आहे. अन्यथा कठोर निर्णय घ्यावा लागेल” असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला.

* शरद पवार यांनी सुचवलेला मार्ग योग्य

धनगर समाजाचा 1000 कोटीचा निधी दिला नाही. ओबीसीसाठी राखीव 50 टक्के निधी आम्हाला मिळायला हवा. शरद पवारांनी सांगितलं की अध्यादेश काढा आणि वाद मिटवा. शरद पवार यांनी सुचवलेला मार्ग योग्य आहे. धनगर समाजासाठी अध्यादेश काढा, अशी आम्ही मागणी करतोय. धनगर समाजासाठी अध्यादेश का निघत नाही हा प्रश्न आहे, असेही शेंडगे म्हणाले.

* अद्याप एकही हॉस्टेल सुरु नाही

धनगर समाजासाठी सहा आणि ओबीसी समाजासाठी 74 हॉस्टेलची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र अद्याप एकही हॉस्टेल सुरु झालेलं नाही. जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला, तर मोठा संघर्ष होईल. मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मिळावे, ही भूमिका घेऊ नये, असे आवाहनही प्रकाश शेंडगे यांनी केले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #धनगरआरक्षण #राज्यसरकार #प्रकाशशेंडगे #सळोकीपळो #ओबीसी #हॉस्टेल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संतप्त माकपने केंद्रीय गृहमंत्र्यांचा सोलापुरात पुतळा जाळला
Next Article शिवसेनेकडून मारहाण झालेल्या माजी नौदल अधिका-यांनी घेतली राज्यपालांची भेट; केली मोठी घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?