मोहोळ : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निषेधार्थ मोहोळ येथील मराठा समाजाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत मोहोळ तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढत आंदोलन केले. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मोहोळ तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणाच्या स्थगितीच्या निषेधार्थ केंद्र व राज्य शासनाची तिरडी बांधून अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेची सुरुवात शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अंत्ययात्रेत मराठा समाजातील बहुसंख्य तरुण सहभागी झाले होते. यात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, एक मराठा लाख मराठा, आरक्षणावरील स्थगिती उठलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
अंत्ययात्रा मोहोळ येथील तहसील कार्यालयावर नेण्यात आली. यावेळी मोहोळच्या निवासी नायब तहसीलदार लिना खरात यांना निवेदन देण्यात आले. यात ११ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला अध्यादेश मागे घेण्यात यावा. यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी मराठा समाजाचे नेते राजन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संतोष गायकवाड, डॉ प्रमोद पाटील, अॅड. श्रीरंग लाळे, तानाजी चटके, बालाजी चटके, मनसेचे शाहुराजे देशमुख, भाजपाचे सतीश काळे, शिवसेनेचे महेश देशमुख, सोमनाथ पवार, प्रभाकर शिंदे, सत्यवान देशमुख, अमोल भोसले, चैतन्य मांडवे, आनंदराव व्यवहारे, दौलतराव देशमुख, बालाजी साठे आदी सह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग होता.