Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; आणखी ११ जण फरार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळगुन्हेगारी

क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; आणखी ११ जण फरार

Surajya Digital
Last updated: 2020/09/16 at 7:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या कुटुंबीयांवर पंजाबच्या पठाणकोट येथे काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात रैनाचे काका अशोक आणि भाऊ कौशल याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी राज्यात सक्रिय असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तीन जणांना आज अटक केली आहे. आणखी ११ जण अजूनही फरार आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज बुधवारी यासंदर्भातील माहिती देत प्रकरण निकाली निघाल्याचं जाहीर केलं. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रैनाच्या ५८ वर्षीय काका अशोक यांची हत्या झाली होती. या हल्ल्यात त्यांची आई सताया देवी, पत्नी आशा देवी, मुलगा कौशल व आपिन हे जखमी झाले होते. त्यानंतर कौशलचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून या टोळीतील तिघांना अटक केली. तर ११ जण अजूनही फरार आहेत. त्यानादेखील लवकरच जेरबंद करण्यासाठी पंजाब पोलीस कार्यरत आहे अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिनकर गुप्ता यांनी दिली. टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी पंजाब रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टींमध्ये छापेमारी केली. तेथेच हे तिघे लपून बसले होते. या छापेमारीत दोन लाकड्याच्या काठ्या, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे दीड हजार रूपये रोख हस्तगत करण्यात आले.

* काळे कच्छेवाला टोळी

पठाणकोटमधील थारियाल गावात १९ आणि २० ऑगस्ट दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ‘काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने आले होते. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर रैनाने स्वत: ट्विट करून मुख्यमंत्री आणि पंजाब पोलीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #सुरैशारैना #फॕमिलीहल्ला #तिघेआटकेत #11जणफरार #काळेकच्छेवाला #टोळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रशियन लस नोव्हेंबरमध्ये भारतात येणार; या वृत्ताने डॉ. रेड्डींचा बीएसईवरील शेअर उसळला
Next Article साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार; बेरोजगार तरुणांमध्ये समाधान

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?