मुंबई : मुंबईतील आमदार निवासावर चढून एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेतन मिळत नसल्याने आमदार निवासावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.
या घटनेनंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून त्या शिक्षकाला समजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आमदार निवासावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणारे हे शिक्षक जालना जिल्ह्यातील असल्याचे बोललं जात आहे. खैरे असे या शिक्षकाचे आडनाव आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या एक तासापासून पोलीस आणि अमरावती विभाग स्थानिक शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे त्या शिक्षकाची समजूत काढत आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक पगार मिळत नसल्याने हा शिक्षक आत्महत्येचा प्रयत्न करत आहे.
आपल्याला लेखी स्वरुपात सर्व पाहिजे आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी पाहिजे, अशी मागणी शिक्षकाने केली आहे. नाना पटोले आणि उदय सामंत यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नाना पटोले यांनी खैरे यांच्याशी स्पीकरच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.