मुंबई : मुंबईवर आक्षेपार्ह विधान करुन प्रसिद्ध मिळवणा-या कंगना रानौतला आता या प्रसिद्धीची चांगलीच चटक लागली आहे. तिला राजकारणाचा लळा लागला असून उर्मिला मातोंडकरला तिकिट मिळू शकते, मग मला का नाही, असा प्रतिसवालच उपस्थित केला आहे. बॉलिवूडला रामराम ठोकून राजकारणात येण्याचा मानस दिसत आहे.
अभिनेत्री कंगना रनौत हिने तोंडसुख घेतल्यानंतर प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची मनोरंजन विश्वातून पाठराखण केली जात आहे. उर्मिला अभिनयासाठी ओळखली जात नाही, ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची हीन भाषेतील टीका कंगनाने केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” असं कंगना टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमना केल्याचा दावाही कंगनाने केला.
“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केली होती.
“क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.
ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याची मागणी उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाकडे केली होती. “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला त्यांची सफाई करुया. मी तुला थंब्ज अप देणारी पहिली व्यक्ती असेन मुली” असा टोलाही उर्मिलाने कंगनाला लगावला आहे.