Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नंदा ओढ्याला महापूर : घरे, पिकांचे नुकसान; दुकाने पाण्यात गेली वाहून, कोट्यवधीचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

नंदा ओढ्याला महापूर : घरे, पिकांचे नुकसान; दुकाने पाण्यात गेली वाहून, कोट्यवधीचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2020/09/19 at 7:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

वेळापूर : शुक्रवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. दुपारी ३ नंतर पिलीव, निमगाव, कुसमुड , मळोली, वेळापूर या परिसरात जोरदार सलग चार-पाच तास पावसाच्या सरी कोसळल्याने आनेक ओढ्यांचे पाणी एकञीकरण होऊन तोंडले— बोंडले येथील नंदाच्या ओढ्यात आले. ढगफुटीसारखा मोठा पाऊस झाल्याने इतिहासात पहिल्यादाच नंदा ओढ्याला पूर आला.

माळशिरस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तोंडले-बोंडले येथील नंदाच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे एकाच रात्रीत ओढ्या काठच्या शेतकरी, रहिवासी, दुकानदार, तोंडले ग्रामपंचायत कार्यालय, दूध बल्क यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

अगोदर झालेल्या पावसामुळे या परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. त्यातच काल पिलीव परिसरात झालेल्या प्रचंड पावसामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी नंदाच्या ओढ्यात एकत्रित मिसळले.

अचानकपणे तोंडले-बोंडले येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ओढ्यातून वाहणारे पुराचे पाणी रात्री दीड वाजेपर्यंत पात्राबाहेर पडून दोन्ही गावच्या शेतात घुसले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या पूर परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग रहिवासी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानभरपाईसाठी प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तसेच मळोली ता. माळशिरस येथेही ओढ्याचे पाणी वेगाने वाढुन लगत राहणार्‍या ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे.

* विक्रमी पावसाची नोंद

मागील काही दिवसापासून सलग पाऊस पडत असून काल माळशिरस तालुक्यात सर्व मंडलामध्ये ९१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यापैकी नंदाच्या ओढ्याचे उगमस्थान असलेले पिलीव मंडलामध्ये ढगफुटी सारखा सर्वाधिक २२१ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

* वीस दुकाने गेली वाहून

ओढ्याला आलेल्या पुरामुळे केळी, ऊस, डाळिंब, मका अशा पिकासह शेतातील माती, घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे २० ते ३० खांब व ३ डीपी जागीच कोसळले आहेत. एक छोटाहाती गाडी व एक मोटारसायकल पाण्यात वाहून गेली आहे. तोंडले येथील ओढ्यालगतची २० दुकाने वाहुन जाऊन मोठे नुकसान झाले आहे. दुधाच्या बल्क कुलरचे दुधासह टाकीव साहित्य वाहुन जाऊन १५ लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

* ग्रामपंचायतीची कागदपञे नष्ट

ओढ्यालगत असलेल्या तोंडले ग्रामपंचायत कार्यालयात वेगाने पाणी घुसून कार्यालयात मोठ्या प्रमाणात चिखल होऊन ग्रामपंचायतीची कागदपञे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तसेच नंदाच्या ओढ्यावरील पुलाचे साईड गार्ड तुटली असून तोंडले गावाकडील भरावा खचून पुलाचा काही भाग वाहून जाऊन मोठा खड्डा पडून दोन्ही गावाचा जवळचा असलेला मार्ग बंद पडला आहे.
ओढ्यातील पुराच्या पाण्याने पंचक्रोशीतील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या ह. भ. प. बाळू पाटील महाराज यांच्या समाधीच्या कलशा सह असणारे छत्र पाण्यात कोसळून वाहून गेले आहे.

* पत्रकार मित्राची तप्तरता

रात्रीच्या सुमारास मळवली ओढ्यात वेगाने पाणी वाढल्याची कल्पना पत्रकार मित्र विजय देशमुख यांना येताच त्यांनी दोन्ही गावातील संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना कल्पना देऊन ओढ्यालगत राहत असलेल्या ग्रामस्थांना वेळेतच लांब हलविण्यात आले ओढ्यात पाणी वेगाने वाढत असल्याने ग्रामस्थांना कपड्यांसह गुरे घेऊन बाहेर पडावे लागले. त्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे जनावरांचा जीव वाचला.

संकलन : महादेव जाधव, पत्रकार

(सुराज्य डिजिटल, वेळापूर)

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #वेळापूर #नंदाओढा #महापूर #घरेपिकांचेनुकसान #कोट्यवधी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निंबर्गीच्या बँक ऑफ इंडियाकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
Next Article सोलापूर शहरात मास्कची सक्ती करा; ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?