अक्कलकोट : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला. न्यायालयीन स्थगिती उठवण्यासाठी आज सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला अक्कलकोट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कडकडीत बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजासह विविध जातीधर्मांचे लोक आंदोलानात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येने युवक वर्ग सामील झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी जैन समाज संघटनेचे अभय खोबरे, बेलदार समाजाचे अशोक जाधव, वागदरी येथील श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव समिती व लिंगायत समाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, वंचित बहुजन आघाडी, रासप यांनीही पाठिंबा दिला. नायब तहसिलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन दिले.
संघर्ष समितीचे संस्थापक सुरेशचंद्र सुर्यवंशी, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, सुभाष गडसिंग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज निकम, शितल फुटाणे, प्रविण देशमुख, नितीन शिंदे, वैभव नवले, संजय गोंडाळ, आकाश शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रविण घाटगे, अप्पू पराणे आदींची उपस्थिती होती.