सोलापूर : घरफोडी केलेल्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी दिल्यामुळे शैलेश गणपत कोकाटे (वय २८, रा. बल्लार चाळ, दमाणी नगर, सोलापूर) या मित्राचा डोक्यात दगड घालून व शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे. आज मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. मयतास दारु पाजून मित्रांनीच खून केल्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रकरणी बबलू राजेंद्र नरळे (वय-३०, रा. बल्लाळ चाळ, दमाणी नगर, सोलापूर) याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उमा नगरी परिसरात बबलू नरळे याने शैलेश कोकाटे यास दुचाकीवरून घेऊन गेला. तेथे दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर बबलू याने शैलेशच्या डोक्यात दगड घालून आणि शस्त्राने वार केले. यात शैलेश जखमी होऊन मरण पावला. दरम्यान पोलिसांनी आरोपी बबलू यास अटक केली आहे.