बेळगाव / नवी दिल्ली : बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज दिल्ली येथे निधन झाल्याची माहिती आहे. कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचा मृत्यू झाला. या निधनामुळे राजकीय क्षेत्राची प्रचंड हानी झाली असून प्रचंड हानी झाली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं Covid-19 मुळे निधन झालं. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोना व्हॉयरसला बळी पडले आहेत. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते.
बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला Corona चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
11 सप्टेंबरला Tweet करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी कळवलं होतं. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. ते 65 वर्षांचे होते. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत. सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.