उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील सह्याद्री रुग्णालयाकडून अँटीजन टेस्टसाठी दोन हजार रुपये आकारले जात होते. याच्या तक्रारी जिल्हाधिकारीपर्यंत तक्रारी गेला. सहयाद्री हॉस्पीटलची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. यात दोषी आढळल्याने दहा हजाराचा दंड केला आहे.
सह्याद्री रूग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय टेस्टसाठी रूग्णांकडून घेतलेले अतिरिक्त 99 हजार 200 रूपये परत देण्याचे आदेश दिलेत. ह्या खाजगी रुग्णालयाकडून कोविड-19 रुग्णांकडून अँटीजन टेस्टसाठी शासकीय दर 600 रुपये असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून दोन हजार रूपये रक्कम घेतली होती. त्याची चौकशी केल्यानंतर ह्या रुग्णालयांने लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तक्रार आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. सह्याद्री मल्टिस्पेशालिटी उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजन टेस्ट केलेल्या एकूण-82 रूग्णांची तपासणी करण्यात आली आली. त्यापैकी 73 रुग्णांना रॅपिड अँटीजन टेस्ट करता आकारलेल्या रक्कमेची पावती देण्यात आली होती. तर 9 रुग्णांना पावती देण्यात आलेली नाही. रॅपिड अँटीजन टेस्टची पावती देण्यात आलेल्या 73 रुग्णांपैकी 66 रुग्णांना प्रत्येकी दोन हजार रुपये, 5 रुग्णांना प्रत्येकी रु. 1600 रुपये आणि दोन रुग्णांना प्रत्येकी 1500 रुपये इतकी रक्कम रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी आकारल्याचे दिसून आले.