Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भरमहासभेत भारताने ठणकावले; जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, पाकिस्तानने रिकामा करावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भरमहासभेत भारताने ठणकावले; जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, पाकिस्तानने रिकामा करावा

Surajya Digital
Last updated: 2020/09/26 at 1:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जगावर असलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे यावर्षी संयुक्त राष्ट्रांची 75 वी महासभा ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पाकव्याप्त काश्मिर आणि काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गरळ ओकल्याचं पाहाला मिळालं.

UN महासभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भारताच्या प्रतिनिधीने जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कब्जा केलेल्या पाकिस्ताननं तो रिकामा करावा, असंही यावेळी महासभेत भारताकडून सांगण्यात आलं. या महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलत असताना त्यांनी भारतावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणादरम्यान भारताचे प्रतिनिधी मिजितो विनितो यांनी महासभेतून वॉकआऊट करत विरोध दर्शवला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान द्वेष आणि हिंसाचार भडकवत आहेत. भारतावर खोटे आरोप करत आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यातून पाकिस्ताननं बाजूला व्हावं असंही भारताच्या प्रतिनिधीने भरमहासभेत पाकिस्तानला यावेळी सुनावलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पाककडून अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न झाला. या मुद्द्यावरून भारताकडून पाकिस्तानला खडसावताना विनितो म्हणाले की, 2019 मध्ये अमेरिकेत सर्वांसमोर या नेत्यानं मान्य केलं होतं की देशात अजुनही 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. ज्यांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिलं आहे. अफगाणिस्तान आणि जम्मू काश्मीरमध्ये लढत आहेत.

‘जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग आहे. उर्वरित वाद काश्मीरच्या त्या भागाशी आहे ज्यावर पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं कब्जा केला आहे. ईश निंदा या कायद्याचा गैरवापर करून मागच्या 70 वर्षांत केवळ अल्पसंख्याक असणाऱ्यांचा पाकिस्तानकडून अत्याचार करण्यात आले. त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं. दहशतवाद आणि कट्टरता, बेकायदेशीर व्यापार याखेरीच पाकिस्तानला गेल्या 70 वर्षात काहीच करता आलं नाही. दहशतवादाला पाठिंबा देणं पाकिस्तानला थांबवावं लागेल’, असंही विनितो यांनी यावेळी सांगितलं.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #महासभा #भारताने #ठणकावले #पाकिस्तान #काश्मीर #अविभाज्यभाग #मोकळेकरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आपल्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नसून कोर्टकचेऱ्यांचा खर्च उचलण्यासाठी विकले घरातील दागिने
Next Article उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन; एक तास आंदोलक ठिय्या मांडून

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?