Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन; एक तास आंदोलक ठिय्या मांडून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन; एक तास आंदोलक ठिय्या मांडून

Surajya Digital
Last updated: 2020/09/26 at 2:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बारामती : आरक्षण तत्काळ लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या बारामती येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या ‘वतीने ढोल बजाओ’ आंदोलन केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थागतीच्या विरोधात बारामतीमध्ये ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात आले. निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज शनिवारी सकाळी आठ वाजता भिगवण रोड वरील पी एन जी चौकातून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायजर चा वापर करण्यात आला. आंदोलकांनी भगवा झेंडा घेऊन व एक मराठा लाख मराठा लिहिलेली टोपी घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

चौकातून आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीकडे घोषणाबाजी करत रांगेत जाताना ‘एक मराठा लाख मराठा,आरक्षण टिकवा नाहीतर मराठा समाजाच्या खासदार,आमदार,मंत्र्यांनी राजीनामा द्या, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय’….अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जवळपास एक तास आंदोलक येथे ठिय्या मांडून बसले होते.यावेळी सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावरमोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन परत सोडून दिल्याचे वृत्त आहे.

तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र आले होते. आंदोलकांनी हातात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश व नोकरीत निवड निश्चित करा तसेच कायद्यात टिकणारे आरक्षण द्या, असे बॅनर हातात घेतले होते. आंदोलकांनी सहयोग सोसायटीच्या समोर पवार यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी करत ढोल वाजवत आंदोलन केले.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #उपमुख्यमंत्री #अजितपवार #घरासमोर #मराठाक्रांतीमोर्चा #आरक्षण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भरमहासभेत भारताने ठणकावले; जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, पाकिस्तानने रिकामा करावा
Next Article सध्या सुनील गावस्कर, अनुष्का-विराटचा विषय गाजतोय, नेमके काय झाले, वाचा सविस्तर

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?