Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मिठाई दुकानदाराची आत्महत्या; 13 सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

मिठाई दुकानदाराची आत्महत्या; 13 सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/09/27 at 10:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : खासगी सावकाराने कर्जासह व्याजाच्या रकमेसाठी दमदाटी, शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने मानसिक त्रासातून केतन विजयकुमार उपासे (रा. सत्तर फूट रोड, गोली अपार्टमेंट) या मिठाई विक्रेत्याने शुक्रवारी आत्महत्या केली. यात तब्बल 13 जणांवर जेलरोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

उपासे यांना सावकाराचे तब्बल 74 लाखांचे देणे होते, अशी माहिती समोर आली आहे. व्यवसाय वाढीसाठी उपासे यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. काही महिने व्याजासह मुद्दल फेडणारे उपासे लॉकडाउनमुळे अडचणीत आले. त्यानंतर त्यांना व्याजाची रक्कम भरणे मुश्किल झाले. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून केतन त्यांनी अशोक चौकातील रेणुका स्विट्स हॉटेल विक्रीस काढले. त्याचा व्यवहार अनिल होटकर व सुभाष जाधव या सावकारांसोबत ठरला. त्या दोघांनी उपासे यांना 10 लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम तीन महिन्यानंतर देण्याचे ठरलेले असतानाही त्यांनी ती रक्कम दिली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

व्यवहार रद्द झाल्यानंतर सावकारांनीच उपासे यांच्याकडे सहा लाख 50 हजार रुपयांचे व्याज मागितले. त्यापैकी उपासे यांनी सव्वातीन लाखांचे व्याज दिले. मात्र, उर्वरित रकमेसाठी त्यांनी त्रास द्यायला सुरवात केली. अनेकदा त्यांनी दुकानामध्ये येऊन केतन यांना शिवीगाळ आणि दमदाटीही केली होती. या खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून उपासे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

या प्रकरणी त्यांचे वडील विजयकुमार उपासे यांच्या फिर्यादीवरून किरण आरगे, जयंत शेळके, अनिल लक्ष्मण जाधव, सोहम गायकवाड, शिवशरण अग्रवाल, पूजा अग्रवाल, सुभाष राजमाने (रा. टेंभूर्णी), सोमा सावकार, बिराण्णा बहिरवडे, काका जाधव, सुरेश अण्णाप्पा कोकटनूर, अनिल अंमदाळे, अनिल होटकर, सुभाष जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

* मोबाइल फ्लॅश मारला होता

उपासे यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी सावकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र त्यांनी आत्महत्येपूर्वी आपला मोबाईल फ्लॅश मारला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना आता वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागणार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा; खासदार उदयनराजेंची मागणी
Next Article भाजप नेते गिरीश महाजनांच्या गाडीचा अपघात; एकजण गंभीर जखमी

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?