सोलापूर : पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ हिंदुत्ववादी, कट्टर सावरकर विचारवंत, भागवताचार्य वासुदेव नारायण उत्पात उर्फ वा. ना. उत्पात यांचे (वय ८०, रा. पंढरपूर ) कोरोनामुळे निधन झाले. संत साहित्य, सावरकर साहित्यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
* वा.ना. उत्पात यांची थोडक्यात माहिती
भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. वा. ना. उत्पात हे गेल्या ३३ वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुमार्सात भागवत सांगत आहेत. श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू आहे. तसेच चातुमार्सात त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने देखील अनेक वर्षे सुरु होती. ते रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
३९ वर्षे त्यांनी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे संस्कृत, मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह, प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने देतात. पंढरपुरातील समाजकारण,राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे़ ते २५ वर्षे नगरसेवक आणि २ वर्षे नगराध्यक्ष होते.
* मिळालेले पुरस्कार
आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यातील काही म्हणजे ‘देवर्षी नारद पुरस्कार,’ ‘महर्षी याज्ञवल्क्य पुरस्कार’,’आदर्श शिक्षक पुरस्कार, अलीकडेच मिळालेले नानासाहेब पेशवे पुरस्कार’ लावणीचा रामजोशी पुरस्कार व सावरकर प्रतिष्ठान पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.