करमाळा : करमाळ्यात आज शनिवारी एकूण 101 जणांची ॲन्टीजीन रॅपीड टेस्टींग कीटद्वारे तपासणी
करण्यात आली. त्यापैकी एकूण 3 कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले. ते सर्व पुरुष असून करमाळा शहरातील आहेत. आज तीनची भर पडल्याने एकूण बाधित संख्या 25 वर गेली आहे.
करमाळा शहरातील कॉविड 19 बाधितची संख्या एकूण 25 (सरकारी दवाखाना व खाजगी तपासणी दोन्ही मिळून) इतकी झाली आहे. तालुक्यातील संख्या 25 असून आजपर्यंत 6 रूग्ण बरे होऊन परतले तर एकाचा मृत्यू झाल्याने 18 जणांवर उपचार सुरू आहे. तसेच करमाळा शहरातील एका व्यक्तीचा बार्शी शहरात उपचार घेत असताना covid19 चा संसर्ग व पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे आज पहाटे मृत्यू झाला आहे. आज तीन बाधितांमध्ये मंगळवार पेठ (वय 41), वेताळ पेठ (वय 40) आणि सुमंत नगर(वय 44)पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान करमाळा शहरात बाधित रूग्ण मिळताच तेथे बांबू ठोकून परिसर बंद करण्यात येत आहे. तर येथील बहुतांश नागरिक व व्यापारी स्वतःहून रस्त्यावर न येणे, दुकाने न उघडणे अशी दक्षता घेवून प्रशासनाला साथ देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, मुख्याधिकारी वीणा पवार, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांसह सर्व नगरसेवक, त्यांचे सर्व कर्मचारी याकामी तत्पर सेवा देत आहेत.