Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: योगी सरकारने सामूहिक बलात्कार प्रकरणी 3 सदस्यीय एसआयटी समिती नेमली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

योगी सरकारने सामूहिक बलात्कार प्रकरणी 3 सदस्यीय एसआयटी समिती नेमली

Surajya Digital
Last updated: 2020/09/30 at 12:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : हाथरस गॕगरेप प्रकरणानंतर पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 19 वर्षीय मुलीवर 4 जणांनी बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या प्रयत्नात जबर जखमी झालेल्या मुलीचा काल उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान आज बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यीय एसआयटी समिती नेमली आहे. तसेच त्यांना 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस गॅंगरेप प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची देखील माहिती दिली आहे.बलात्कार पीडीत मुलगी 19 वर्षीय दलित असून तिच्यावर बलात्कार व अमानुष अत्याचार करणारे 4 जण सवर्ण जातीतील असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषींना कडक शासन देण्याचे आदेश दिले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यीय SIT समितीमध्ये अध्यक्ष सचिव गृह भगवान स्वरूप, चंद्रप्रकाश, पुलिस उपमहानिरीक्षक व श्रीमती पूनम, सेनानायक पीएसी आगरा यांचा समावेश असेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उत्तर प्रदेशातील हाथरस गॕगरेप प्रकरणानंतर देशभरातून राजकीय, बॉलिवूड जगतातील सेलिब्रिटींसोबतच सामान्यांनीदेखील आपला रोष व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान पीडीतेवर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळेस तिच्या कुटुंबियांना घरातच कोंडून ठेवण्यात आल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. सध्या यावरून देखील राजकारण तापले आहे. अनेक राजकीय मंडळींनी सरकारी यंत्रणेवर यावरून ताशेरे ओढले आहेत.

* जबरदस्तीने यूपी पोलिसांकडून अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मध्यरात्री 2.30 वाजता या पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोप करण्यात येत आहे की, पीडितेवर अंत्यसंस्कार होत असताना पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना घरामध्ये बंद करुन ठेवले होते. दावा करणयात येत आहे की, पीडितेवर अंत्यसंस्कार करतानाचा एक व्हिडिओही बनविण्यात आला आहे. यात पोलिस पीडितेच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.

पीडितेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर पीडेतेचे कुटुंबीय उभे होते. अंत्यसंस्कार करण्यास विरोध करत होते. परंतू, पोलिसंनी कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता पीडितेवर अंत्यसंस्कार केले. पीडितेची आई रुग्णवाहिकेसमोर रस्त्यावर आडवी झोपली तरीही पोलिस थांबले नाहीत. पोलिसांनी अंत्यसंस्कार केले.

पीडितेच्या भावाने आरोप केला आहे की, कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता पोलिस पीडेतेचे शव घेऊन घरापासून दूर गेले. तिथे जाऊन त्यांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले. पीडितेचा भाऊ आणि वडील पोलिसांच्या कृतीविरोधात धरणे धरुन बसले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा भाऊ आणि वडिलांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत बसवले आणि त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. स्थानिकांनीही पोलिसांच्या या कृतीला विरोध केला.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #योगीसरकार #गॕगरेप #चौकशी #एसआयटी #अंत्यसंस्कार #जबरदस्ती #पीडित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तिचे कंबरेचे हाडही मोडले; योगी सरकारची महाराष्ट्राकडून कानउघाडणी
Next Article मोठा निकाल : बाबरी मशीद उध्वंस प्रकरणात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?