सोलापूर : उत्तर प्रदेश हाथरस येथील सामूहिक अत्याचारामध्ये बळी पडलेल्या पीडितेला युवक काँग्रेस व प्रियदर्शनी सेल च्या वतीने आज (बुधवारी) रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रद्धांजली वाहून आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, प्रियदर्शनी सेल प्रमुख श्रद्धा हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शहर मध्य योगेश मार्गम, दक्षिण सोलापुर अध्यक्ष सैफन शेख, गोविंद कांबळे, राणी वाघमारे यांची उपस्थिती होती.
प्रियदर्शनी सेलच्या श्रद्धा हुल्लेनवरु म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिकपणे अमानुष बलात्कार करण्यात आला. प्रचंड मारहाण करुन झालेल्या अत्याचाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभही कापण्यात आली. 9 दिवस पोलिसांनी कोणतीच करवाई केले नाही. गंभीर अवस्थेत असतानादेखील योग्य ते उपचार मिळाले नाही. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तिच्या यातना कमी झाल्या नाहीत. उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने जबरदस्ती करून त्या मुलीच्या परिवाराच्या अनुपस्थितीमध्ये त्या मुलीचा अंत्यविधी केला. या सर्व प्रकारचा जोरदार निषेध केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी केली. यावेळी प्रियंका डोंगरे यांनीही आरोपींना फाशी शिक्षा देण्याची मागणी केली
यावेळी विवेक इंगळे, संजय गायकवाड, राजेन्द्र शिरकुल, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, विश्वास गज्जम, रोहित भोसले, श्रीवेणी आड़म, साक्षी गवळी, प्रगती डोंगरे, उमर मुकेरी, आनंद भंडारे, सचिन हेगाडे, प्रकाश नाइकवाडी, सौरभ साळुंखे, श्रीनिवास परकीपंडला, संजय फरड, शंकर माडेकर, अश्विनकुमार आतकरे, मुजाहिद जमादार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.