Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकनाथ खडसे नाराजीच्या परमोच्च स्थानावर; लवकरच मोठी बातमी देण्याची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ खडसे नाराजीच्या परमोच्च स्थानावर; लवकरच मोठी बातमी देण्याची घोषणा

Surajya Digital
Last updated: 2020/10/01 at 4:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जळगाव : व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली. भाजपाच्या बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराजीच्या परमोच्च स्थानावर आहेत. याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून  सहभागी झाले होते.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय संघटक प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री सतीश गंगवार, विजय पुरानिक, सुधीर मनगुंटीवार आदी नेते सहभागी झाले होते.  या बैठकीत पक्ष संघटन, विविध राजकीय घडामोडी व इतर विषयांवर चर्चा झाली.

* बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत

या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याविषयी माहिती देणे खडसे यांनी टाळले. तसेच कार्यकर्ता व खडसे यांच्यातील संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल विचारले असता तो विषय आता जुना झाला असून तीन-चार दिवसात मोठी बातमी देतो, असे सांगून बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले. या बैठकीमध्ये ऑडिओ क्लिप विषयी देखील विचारणा झाल्याची माहिती असून त्याविषयी मात्र खडसे यांनी बोलणे टाळले. तसेच क्लीप मधील संवादानंतर राष्ट्रीय स्तरावरील नेते खडसे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सहभागी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

You Might Also Like

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

TAGGED: #एकनाथखडसे #नाराजीच्या #परमोच्च #शिखरावर #तीनचारदिवसात # मोठीबातमी #संकेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युपी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की करुन खाली पाडले; देशभर संताप
Next Article पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल; चंद्रकांत पाटलांनी सस्पेन्स वाढवला

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?