Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हाथरस प्रकरणावरुन राज ठाकरेही संतापले; महाराष्ट्राला प्रश्न विचारणारे आता गप्प का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

हाथरस प्रकरणावरुन राज ठाकरेही संतापले; महाराष्ट्राला प्रश्न विचारणारे आता गप्प का?

Surajya Digital
Last updated: 2020/10/01 at 11:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून, ही घटना पाशवी असल्याचं म्हटलं आहे. याचसोबत महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेला काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला धारेवर धरत आहेत. पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

* पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जातंय ?

राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे, असा प्रश्न विचारला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात होते. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींना अडवून त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे.

* म्हणे बलात्कार झालाच नाही

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला होता. तसंच तिचा गळा दाबण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ‘अंतिम निदान’मध्ये बलात्कार झाला आहे याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानेच शविवच्छेदन अहवाल तयार केला आहे. उपचारासाठी पीडितेला अलिगड रुग्णालयातून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शवविच्छेदन अहवालानुसार, मणक्याला फ्रॅक्चर झाला असताना रक्तस्त्रावदेखील झाला होता.

यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अहवालात सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा जपून ठेवण्यात आलं असून इतर महत्त्वाचे नमुने तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #राजठाकरे #हाथरस #संतापले #महाराष्ट्र #प्रश्न #गप्प #का?
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रामाचे नाव आणि कृती नथुरामाची; शरद पवार, सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांकडून राहुल गांधी धक्काबुक्कीचा निषेध
Next Article दोन भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामासह तिघाचा बुडून मृत्यू

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?