नवी दिल्ली : मी जगात कोणालाही घाबरणार नाही, कोणत्याही अन्यायासमोर किंवा कोणासमोरही झुकणार नाही. असत्यावर सत्याच्या मार्गाने विजय मिळवेन. तसेच असत्याचा विरोध करताना होणारे कष्ट सहन करीन, सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा’ असे ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
असत्याविरोधात लढताना होणारे कष्ट सहन करण्याचे बळ मिळावे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कृषी कायद्याविरोधात शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधून शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. सोमवारी हा मोर्चा हरियाणात पोहचणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या ट्विटला महत्त्व आले आहे.
हाथरस येथे काढण्यात आलेल्या लाँग मार्चमध्ये राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि शेतकरी मोर्चाला हरियाणात प्रवेश करू देणार नाही, अशी तेथील मंत्र्याची भूमिका या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या ट्विटला महत्व आले आहे. आपण कोणालाही घाबरणार नाही आणि अन्यायासमोर झुकणार नाही, तसेच अन्यायविरोधात लढण्याच निर्धार त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला आहे. महात्मा गांधी जयंतीला त्यांनी सकाळीच हे ट्विट करत जनतेला संदेश दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* राहुल गांधींना हरियाणात प्रवेश नाही : मंत्री अनिल वीज
शेतकरी मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभगी होण्याची शक्यता आहे. हा मोर्चा तीन दिवसात 50 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत मोर्चा काढण्यात येत आहे. पंजाबमधून शनिवारी मोर्चाला सुरुवात होणार आहे. रविवारी राहुल गांधी यांची भवानीगडमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मोर्चा हरियाणात प्रवेश करणार आहे. हरियाणात सोमवारी कैथल आणि कुरुक्षेत्रमध्ये राहुल यांच्या सभा होतील आणि त्यानंतर ते दिल्लीला परतणार आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. तर राहुल यांना पंजाबमध्ये जे आंदोलन करायचे असले, ते त्यांनी करावे. मात्र त्यांना हरियाणात प्रवेश करू देणार नाही, अशी भूमिका हरियाणातील मंत्री अनिल वीज यांनी घतेली आहे.