अकलूज : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज,योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ५ अॉक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह सर्व महामानवाच्या पुतळ्यांना अभिवादन करून अकलूज ते माळशिरस पदयात्रा काढली जाणार आहे.
अकलूज ,संग्रामनगर, पाटील वस्ती, वटपळी, मार्गे माळशिरस अशी पदयात्रा काढून तहसीलदार माळसिरस यांना तहसील कार्यालय माळसिरस येथे निवेदन दिले जाणार आहे. तरी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी तसेच माळशिरस तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणावर पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक वेळेस खेळवल जात आहे.आणि आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजातील उच्च शिक्षित मुले आरक्षणामुळे बेरोजगारीत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपर्यंत कित्येक बळी गेले आहेत. काही दिवसापूर्वीच बीडमधील मराठा विद्यार्थ्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापत आहे. अजून किती विद्यार्थ्यांचे बळी सरकार घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी केंद्र सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरती विचार करावा व लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.