पुणे : पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व अशोक काशिनाथ काळभोर ( वय ६९ ) यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.२००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे ते अतिशय जवळचे सहकारी होते.
१९९२-९३ मध्ये त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तर १९८९ मध्ये १ वर्ष व २००६ नंतर सलग ५ वर्षे त्यांनी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून प्रभावी कामगिरी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी गुलटेकडी येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले होते. तसेच शरद हवेली खरेदी विक्री संघाचे ते संस्थापक होते. यासमवेत शेतकरी हितासाठी हवेली तालुक्यात विविध सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली होती.
तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य व लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.